चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना तालुक्यातील मांदूरणे शिवारात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील मांदूरणे शिवारात नितीन नाना नामेकर (वय-२३) आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी शुक्रवार १७ जून रोजी सकाळी शेतात गेला होता. त्यावेळी शेतातील विजेच्या खंव्यात विज उतरलेली होती. याला नितीनचा स्पर्श झाल्याने त्याला जोराधा विजेचा धक्का बसला त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान नितीनच्या शेतातून आबा माळी हे दुध काढण्यासाठी जात असतांना नितीन निपचित पडलेला दिसून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नितीनला आपला जीव गमवावाला लागला असून प्रचंड संताप व्यक्त केला. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे. नितीनच्या पश्चात आई, वडील, बहिण आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.