Home क्राईम खळबळजनक : लग्नासाठी युवतीची दोन लाखात विक्री

खळबळजनक : लग्नासाठी युवतीची दोन लाखात विक्री

0
45


रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाल येथील एका २५ वर्षीय युवतीला नास्तामध्ये गुंगीचे औषध देवून दोन लाखात मध्य प्रदेशातील एका तरुणाला विक्री करून विवाह करून दिल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे रावेर पोलीस स्टेशनला आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत वृत्त असे की, “दि १३ जुलै २०२१ ते १२ जून २०२२ च्या दरम्यान पाल ता रावेर येथील एका २५ वर्षीय तरुणीला दोन अनोळखी महिलांनी नाश्त्यामध्ये गूंगीचे औषध देवून तिला मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्हात घाटपिपल्या येथील राकेश वर्मा वय ३० याला दोन लाख विक्री करत जबरजस्तीने विवाह लावून दिला.

त्या नंतर पिडीतीवर राकेश याने लैंगिक अत्याचार केला; तर पिडीतीची सासू शामू वर्मा, सासरे भगिरत वर्मा, दिर कमल वर्मा, दिर दिनेश वर्मा, नंनद तेजू यांनी संगममताने पिडीतला डांबून ठेवत मारहाण केली. याबाबत पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीत मध्य प्रदेश येथील वर्मा कुटुंबासह दोन अनोळखी महिलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे पुढील तपास करीत आहे.


Protected Content

Play sound