Home क्राईम पिंप्राळा परिसरातील विद्यूत खांब्याचा शॉक लागून गाय दगावली

पिंप्राळा परिसरातील विद्यूत खांब्याचा शॉक लागून गाय दगावली

0
111


जळगाव  लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील पिंप्राळा परिसरातील मढी चौकात विद्यूत खंब्यातील विजेच्या धक्क्याने गाय दगावल्याची घटना रविवार, दि. १२ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलीसात अद्यापपर्यंत कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, “पिंप्राळा परिसरातील राहणारे राजेंद्र पाटील हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी १२ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली होती. जवळपास अर्धातास पाऊस सुरू होतो. त्यावेळी पिंप्राळा येथील मढी चौकात विद्यूत खंब्यात विद्यूत प्रवाह उतरला होता. त्यावेळी राजेंद्र पाटील यांची गाय चरत असतांना विद्यूत खंब्याला धक्का लागल्याने दगावल्याची घटना घडली.”

गाय दगावल्याची लक्षात आल्यावर पिंप्राळा येथील मढी चौकातील नागरीकांची गर्दी झाली होती. याप्रकरणानंतर महावितरण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound