Home क्राईम समर्थ कॉलनीत बंद घर फोडून दागिन्यांची चोरी

समर्थ कॉलनीत बंद घर फोडून दागिन्यांची चोरी

0
49
gharfodi
gharfodi


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील स्नेहसुधा समर्थ कॉलनीत बंद घरातून ६४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत गुरूवार ९ जून रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप सुरेश सोमनी (वय-५५) रा. समर्थ कॉलनी हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता ते १६ मे सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान खासगी कामासाठी ते बाहेरगावी गेले असतांना त्यांचे घर बंद होते.  बंद घराचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील  ६४ हजार २७६ किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. वीस दिवसानंतर अखेर संदीप सोमानी यांनी गुरुवार ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संजय सपकाळे करीत आहे.

 


Protected Content

Play sound