Home Uncategorized पाच लाखासाठी विवाहितेचा छळ

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ

0
23

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील माहेर असलेल्या विवाहितेचा पाच लाखासाठी छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, “यावल शहरातील माहेर असलेल्या विवाहिता प्रणाली राहुल आमोदकर (वय-२४) यांचा विवाह रहेमतपुरा ता. कोरेगाव जि.सातारा येथील राहुल नोमदास आमोदकर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नात हुंडा दिला नाही. म्हणून विवाहितेला माहेरहून ५ लाख रूपये आणावे; यासाठी पती राहूल आमोदकर याने शिवीगाळ करून छळ करण्यास सुरूवात केली.

त्यानंतर सासरे, सासू  जेठ यांच्यासह इतरांनी पैशांचा तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता यावल येथील माहेरी निघून आल्या. सोमवारी ६ जून रोजी दुपारी यावल पोलीस ठाण्यात धाव घेतली.”

विवाहितेच्या फिर्यादीवरून पती राहुल नोमदास आमोदकर, सासरे नोमदास नथ्थु आमोदकर, सासू नलिनी नोमदास आमोदकर, जेठ विकास नोमदास आमोदकरी व इंताजबाई शौकत सैय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ बालक बार्‍हे करीत आहे.


Protected Content

Play sound