जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ड्युटीवरुन मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घरी जात असतांना समोरुन येणार्या दोघांनी प्रौढाचा गळा दाबून त्यांना लुटल्याची घटना शुक्रवार, दि. ३ रोजी शिवाजी नगरातील ख्रिश्चन स्मशानभूमीजवळ घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी आध्गिक माहिती अशी की, “शहरातील शिवाजी नगर परिसरातील वज्रेश्वरी मंदिराजवळ वाल्मिक उत्तम मोरे (वय-४३) हे वास्तव्यास आहे. ते एटी महामंडळात लिपीक पदावर नोकरीस असून शुक्रवार, दि. ३ रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घरी पायी जात होते. यावेळी ख्रिश्चन स्मशानभूमीजवळून जात असतांना त्यांच्या समोरुन दोन व्यक्ती त्यांच्याकडे आले. त्यांच्यातील एकाने मोरे यांचा गळा दाबून धरला तर दुसर्याने मागून येवून त्यांचे हात घट्ट पकडून ठेवले. यावेळी त्यातील एकाने मोरे यांच्या खिशातील दहा हजार रुपयांचा मोबाईल व पाचशे रुपये रोख असे काढून घेत त्याठिकाणाहून पसार झाले.”
याप्रकरणी आज वाल्मिक मोरे यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.