पहूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रात सर्वात मोठी विविध कार्यकारी सोसायटी म्हणून ओळख असलेल्या पहूर पेठ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पुरस्कृत सहकार विकास पॅनल व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल अश्या दोन पॅनलमध्ये काट्याची लढत होणार आहे.
पहूर पेठ विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात निवडणूक लढवित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना पुरस्कृत सहकार विकास पॅनलचे नेतृत्व माजी जि. प. कृषी सभापती प्रदीप भाऊ लोढा, सहकार महर्षी भास्कर दादा पाटील, शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पुरस्कृत पॅनलचे उमेदवार पुढील प्रमाणे भास्कर शंकर पाटील, शामराव सावळे, संजय तायडे, रवींद्र तुळशीराम पाटील, रवींद्र विठ्ठल बारी, फारूक मोहम्मद राज मोहम्मद, सतीश रायचंद लोढा, शरद बाबुराव पांढरे, अशोक देशमुख, सुकलाल बळीराम बारी, वसंतराव मोरे, कौशल्याबाई देशमुख, कौशल्याबाई किसन पाटील असे तेरा उमेदवार आहेत. तसेच भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व आमदार गिरीश महाजन व माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे हे करीत आहे. त्यांच्या पॅनलचे उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाकर बारी, संतोष चिंचोले, रामेश्वर पाटील, साहेबराव देशमुख, अरुण घोलप, राजेश जैन, शेख इस्माईल नुर मोहम्मद, अभय पांढरे,किरण खैरनार, गोकुळ कुमावत, रवींद्र बारी, संध्या पाटील, सुशिलाबाई देशमुख,असे १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकास एक अशी सरळ लढत असून १२ जून रोजी मतदान होणार आहे तर मतदान झाल्यानंतर त्वरित निकाल हाती लागणार आहे. जामनेर तालुक्यातील सर्वांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
आज दोन्ही पॅनलचे प्रचार शभारंभ
जामनेर रोडलगत असलेल्या भवानी माता मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. मतदारांच्या भेटी-गाठी दोन्ही पॅनलचे उमेदवार करीत आहे.