Home Uncategorized म्हसावद येथे ग्रामरक्षक सुरक्षा दलाची स्थापना

म्हसावद येथे ग्रामरक्षक सुरक्षा दलाची स्थापना

0
53

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथे ग्रामरक्षक सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली असून २५ सुरक्षा कर्मचाऱ्यांना सुरक्षा रक्षक पोलीस मित्र कार्डचे वाटप करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील म्हसावद गावात आज पोलीस स्टेशन म्हसावद एस. आय. उगले यांच्या हस्ते व हेडकॉन्स्टेबल स्वप्नील पाटील यांच्या हस्ते पोलीस स्थानकात ११ वाजता ग्रामसुरक्षा दल  पोलीस मित्र यांचे आयकार्ड वाटण्यात आले व त्यांना गावात छोट्या मोठ्या होणाऱ्या चोर्‍या थांबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली. यावेळी पोलिस पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थितीत होते.

 


Protected Content

Play sound