Home Cities जळगाव लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम

0
74

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेहरुण येथील गोपीनाथराव मुंडे चौकामध्ये शुक्रवार दि.३ जून रोजी सकाळी ९.३० वाजता अभिवादन केले जाणार आहे. या वेळेला पालकमंत्री, महापौर यांच्यासह शहरातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

 

माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी आणि जळगाववासियांनी मोठ्या संख्येने सकाळी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी मेहरुणचे नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह वंजारी युवा संघटनेने केले आहे.

 


Protected Content

Play sound