Home धर्म-समाज परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी

0
36

सावदा ता. रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ब्रह्म महाशिखर परिषदेचे अध्यक्ष सुरेश मुळे आणि सखाराम कुलकर्णी यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली.

ब्राह्मण समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आर्थिक बाजू कमकुवत असल्याने ब्राह्मण समाजाच्या मुला – मुलींना शिक्षण घेता येत नाही. परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्यास महामंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून पुढे शिक्षण घेता येईल व विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होईल.पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, अशी मागणी ब्रह्म महाशिखर परिषद अध्यक्ष  सुरेश मुळे व सखाराम कुलकर्णी यांनी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांच्याकडे सदिच्छा भेटीत केली. यावेळी राष्टीय कमिटी बहुभाषीय ब्राह्मण महासंघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound