देवेंद्र राजपूत यांची कृषी क्षेत्रातील राज्यस्तरिय पुरस्कारासाठी निवड

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे येथील देवेंद्र रघुनाथ राजपूत यांची महाराष्ट्र पत्रकार संघाचा सामाजिक व कृषी क्षेत्रातील राज्यस्तरिय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

 

देवेंद्र राजपूत यांनी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन पर विविध शिबीरांचे आयोजन, कमी खर्चात जास्त उत्पन्न अशा बऱ्याच बाबतीत नेहमी त्यांनी जनजागृती केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याना त्यांचा फायदाही झाला आहे. भुसावळ येथे ते व्यवसायानिमित्त स्थायिक झाले असून शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी उत्तर महाराष्ट्रसह विदर्भ आदी भागात त्यांनी शेतकऱ्यांना प्रबोधन होईल असे उपक्रम राबविले आहेत. त्यांचा या कार्याची नोंद घेत महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या हस्ते शिर्डी येथील कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने सन्मानीत केले जाणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल कळमसरे ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच सदस्य सह ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

Protected Content