लहान मुलांच्या खेळण्यावरून महिलांमध्ये हाणामारी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरात लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून महिलांमध्ये चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुमय्याबी अय्युब खान (वय-२७) रा. शिवाजी नगर या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी २४ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अंगणात लहान मुले चकरी खेळ खेळत असतांना चकरी ही शेजारी राहणाऱ्या मंगला जाधव यांच्या घरावर गेला. या कारणावरून मंगला जाधव आणि लक्ष्मी जाधव दोन्ही रा. शिवाजी नगर यांनी सुमय्याबी अय्युब खान यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी सुमय्याबी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात  मंगला जाधव आणि लक्ष्मी जाधव दोन्ही रा. शिवाजी नगर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संदीप परदेशी करीत आहे.

Protected Content