राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चातर्फे बुधवारी भारत बंद आंदोलन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक प्रश्नांवर आधारित टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येत आहे. त्याआधी निदर्शने, मोर्चे काढण्यात आले असून २५ मे रोजी भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे.

या आंदोलनासाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील विविध संघटनांनी भारत बंदला पाठिंबा व सक्रिय सहभाग दर्शविला आहे. सदरील भारत बंदचे केंद्र सरकारविरोधात पुढील विविध सामाजिक मुद्यांवर आधारित आयोजन करण्यात आले आहे.

केंद्र सरकार द्वारा इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) ची जातनिहाय जनगणना करणेसाठी, EVM (ई.व्ही.एम.) घोटाळ्याच्या विरोधात व ईव्हीएम बंद करुन बैलेट पेपरवर निवडणुका घेणेसाठी, खाजगी क्षेत्रामध्ये एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. आरक्षण लागू करणेबाबत, M.S.P. (एम.एस.पी.) गॅरंटी कायदा बनवून शेतकऱ्यांना न्याय देणेसाठी, एन. आर. सी. / सी.ए.ए. / एन.पी.आर. च्या विरोधात, जूनी पेंशन योजना लागु करणेसाठी, मध्यप्रदेश, ओडीसा आणि झारखंड मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र मतदार संघ लागू करणेसाठी, पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली आदिवासींना जल, जंगल व जमीन यापासुन विस्थापित करण्याच्या विरोधात, जबरदस्ती दबाव आणून करण्यात येत असणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या विरोधात, लॉकडाऊन काळात कामगारांच्या विरोधात बनविलेल्या श्रमिक कायद्याच्या विरोधात सदर मुद्दे जनसामान्य ओ.बी.सी., एस.सी., एस.टी., अल्पसंख्यांक यांच्या सामाजिक हिताचे असल्याने या आंदोलनात विविध सामाजिक समूह, संघटना व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सर्व नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओ.बी.सी.) मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे सह पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे.

 

Protected Content