Home क्राईम रेल्वे रूळावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

रेल्वे रूळावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला


Crime

जळगाव प्रतिनिधी । जळगाव भादली रेल्वेस्थानकाच्या दरम्यान रेल्वे रूळावर एक अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. मयत रेल्वेतून पडला की आत्महत्या केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. याबाबत शनीपेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, ट्रकमॅन शेख शखील हे रेल्वे रूळाचे ट्रकींगचे काम जळगाव भादली दरम्यान करत असतांना त्यांना रेल्वे खंबा क्रमांक 421/02 जवळ एक अनोळखी मृतदेह आढळून आला. त्यांनी जळगाव उपरेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. रेल्वे उपप्रबंधक आर.के.पालेजा यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ शेख करीम शेख गफ्फार हे करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound