Home क्राईम कासमवाडीच्या आठवडे बाजारातून शेतकऱ्याचा मोबाईल लंपास

कासमवाडीच्या आठवडे बाजारातून शेतकऱ्याचा मोबाईल लंपास


*जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी *| शहरातील कासमवाडी भागातील आठवडे बाजारात बाजारासाठी आलेल्या शेतकऱ्याचा २५ हजारांचा मोबाईल लंपास झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील रायसोनी नगर येथे लालचंद बाजीराव पाटील (वय ५०) हे वास्तव्यास आहेत. ते शेतीकाम करून कुटुंबाची उपजीविका भागवित असतात. शनिवारी लालचंद पाटील हे कासमवाडी परिसराती आठवडे बाजारात आले होते. यादरम्यान त्यांच्याकडील २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी चोरुन नेला. प्रकार लक्षात आल्यानंतर लालचंद पाटील यांनी बाजारात शोध घेतला मात्र मिळून आला नाही. चोरीची खात्री झाल्यावर लालचंद पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश सपकाळे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound