मुंबई, लाइव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | सक्त वसुली संचालनालय अर्थात इडीकडून मुंबई आणि पुण्यातील खाजगी कंपनीच्या सुमारे ७५ एकर जमिनीसह बँकेतील साडेसात कोटी रुपयांवर जप्तीची कारवाई केली आहे. इडीकडून पीएमपीएल अंतर्गत हि कारवाई करण्यात आली आहे.
देशातील अनेक राज्यांतील पाच कोटीहून अधिक गुंतवणूकदारांची पर्ल ग्रुपच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप आहे. ६० हजार कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील चौकशीनंतर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. पर्ल ग्रुपची मुंबई आणि पुण्यातील ७५ एकर जमीन आणि बँकेतील साडे सात कोटीही ईडीने जप्त करण्यात आले आहेत. दिल्ली, चंदीगड, कोलकाता, भुवनेश्वर यासह अनेक ठिकाणी सीबीआयने छापे टाकून पर्ल घोटाळ्याचा तपास सीबीआय आणि ईडी करत आहे. या ग्रुपची वसई पट्ट्यातील ७५ एकरची जमीनीची किंमतच सुमारे १८७ कोटीच्या जवळपास असल्याची माहिती आहे.