Home Cities यावल दहिगाव येथे तरुणाचा मृतदेह आढळला

दहिगाव येथे तरुणाचा मृतदेह आढळला

cba6e9e7 8e99 4f3f 8cd6 1ab72ac36434
cba6e9e7 8e99 4f3f 8cd6 1ab72ac36434

cba6e9e7 8e99 4f3f 8cd6 1ab72ac36434

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथे एका तरुणाचा मृतदेह गावाजवळच्या शेताजवळील पाण्याच्या कुंडाजवळ मिळुन आला आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दहिगाव येथे गावालगत असलेल्या चिंतामण भिकन पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ असलेल्या पाण्याच्या कुंडात आज सकाळी गावातील गणेश ज्ञानदेव पाटील (वय-३३) हा तरूण मृतावस्थेत आढळुन आला आहे. या घटनेची खबर येथील किशोर तुकाराम पाटील यांनी यावल तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानुसार आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे. गणेश पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound