किन्ही येथे महाकवी वामनदादा कर्डक यांना आदरांजली

भुसावळ, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किन्ही येथील विश्वशांती विहारात प्रागतिक विचार मंचातर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.

 

भुसावळ येथील प्रागतिक विचार मंचच्या टीमने आज महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून “विश्वशांती विहारास ” भेट दिली. वामनदादा कर्डक यांचे कला शिष्य कालकथीत किसन दुला सुरवाडे यांचे गाव असून प्रागतिक विचार मंचातर्फे गावास भेट देवून त्यांना अभिवादन केले. यावेळी मंचचे अध्यक्ष जे. पी. सपकाळे यांनी सेवा प्रकल्पाबाबत संवाद साधला. याप्रसंगी झालेल्या चर्चेत किन्ही येथील रहिवाशी असलेले मुंबईस नोकरीनिमित्ताने स्थिरावलेले प्रमोद सुरवाडे, मोरे सर, सुभेदार रामजी विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संजयभाऊ सुरवाडे, दिलीपदादा सुरवाडे, संशोधक विद्यार्थी संदीप सुरवाडे यांनी सहभाग नोंदवून सामाजिक सेवा प्रकल्पास सहकार्य करण्याचे सांगितले. या चर्चेत प्रागतिक विचार मंचचे प्रा. डॉ. जतिन मेढे , समाधान जाधव , सह सचिव प्रा. प्रशांत नरवाडे, दिलीप सुरवाडे, सचिव प्रशांत तायडे आदींनी सहभाग घेतला. प्रास्ताविक दिलीप सुरवाडे तर आभार प्रशांत तायडे यांनी मांडले.

Protected Content