Home क्राईम अल्पवयीन मुलीचे अपहरण; एकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे अपहरण; एकावर गुन्हा दाखल

0
106

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील धानोरा बुद्रूक येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात जळगाव  तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धानोरा बुद्रूक येथे अल्पवयीन मुलगी तिच्या घरी असतांना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तिला काही तरी फूस लावून तिचे अपहरण केले. मुलगी मिळून न आल्याने तसेच तिचे कोणीतरी अपहरण केल्याची खात्री झाल्यावर मुलीचे वडीलांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. दादा पांडुरंग पारधी रा. चोपडा या तरुणाने तिला पळवून नेल्याचा संशय तक्रारीत नमूद करण्यात आला असून त्यावरुन दादा पांडुरंग पारधी यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश सायकर हे करीत आहेत.


Protected Content

Play sound