कुलगुरूच लाच घेतांना अटकेत : तपासाच्या दरम्यान आढळले घबाड

कोटा-वृत्तसंस्था | कोटा तांत्रीक विद्यालयाचे कुलगरू तथा युपीएससीचे माजी सदस्य डॉ. रामावतार गुप्ता यांना पाच लाख रूपयांची लाच घेतांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

कोटा तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रामावतार गुप्ता यांना ५ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. कोटा तांत्रिक विद्यापीठाच्या अखत्यारित असलेल्या एका महाविद्यालयात इंजिनीअरिंगच्या जागा वाढवण्यासाठी गुप्ता यांनी १० लाख रुपये लाचेची मागणी केली होती. यातील ५ लाखांची लाच स्विकारताना सरकारी विश्रामगृहातून त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. गुप्ता हे यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे आणि राजस्थान लोकसेवा आयोगाच्या निवड समितीचे देखील सदस्य राहिले आहेत. यामुळे या कारवाईमुळे खळबळ उडालेली आहे.

दरम्यान, तपासादरम्यान गुप्ता यांच्या सुटमधून २१ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. यानंतर लाचलुचपत विभागाने कुलगुरु गुप्तांच्या जयपूर येथील खाजगी निवासस्थानी आणि कोटा येथील सरकारी निवासस्थानी छापेमारी केली आहे. यात लाचलुचपत विभागाने रामावतार गुप्ता यांच्या निवासस्थानी केलेल्या छापेमारी दरम्य  अधिकार्‍यांनी तपासात ३ लाख ६४ हजार रुपये रोकड, अर्धा किलो सोनं, ६.६९ किलो चांदी जप्त केली आहे. यासोबतच रामावतार आणि त्यांच्या पत्नीच्या नावावरील एकूण १८ बँकांमधील विविध खात्यांमध्ये मिळून ६८ लाख ७२ हजार रुपये रोकड मिळाली आहे.

 

Protected Content