यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमा ब्राम्हण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचा समस्त ब्राम्हण समाज संघ आणि परशूराम मंडळाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत आमदार मिटकरी यांच्यावर गुन्हा करावा अशी मागणीचे निवेदन तहसीलदार महेश पवार यांना दिले
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अमोल मिटकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात बाह्यण समाजाबद्दल आक्षेपार्क वक्तव्य करून समाजात जातीय द्वेष पसरवित असून त्यांच्या सभेत राज्याचे मंत्री जयंत पाटील, धंनजय मुंडे यांनी देखील त्यांच्या वक्तव्यावर हसून दाद दिली. दरम्यान, यावल येथे संपुर्ण बाह्मण समाजाच्या बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आले. आमदार अमोल मिटकरी यांच्या विरूद्ध समस्त बाह्यण समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांचे विधानमंडळ सदस्यत्व रद्द करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. यावल तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांना वेदशास्त्र शामशास्त्री नाईक यांच्या नेतृत्वाखाली सदरचे निवेदन देण्यात आले. यावेळी मोठया संख्येत समाजबांधव व महीला भगीनी उपस्तित होत्या.