जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घर बांधण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहिता माधुरी पवन धनगर (वय-२१) यांचा विवाहित कोल्ह ता.पाचोरा येथील पवन बाबूलाल धनगर यांच्याशी मार्च २०२१ मध्ये रितीरिवाजानुसार लग्न झाले. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले, त्यानंतर मात्र पती पवन धनगर याने विवाहितेला लहान-सहान कारणांवरून टोमणे मारणे सुरु केले. त्यानंतर घराच्या बांधकामासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे, यासाठी तगादा लावला. परंतु विवाहितेच्या आई-वडिलांचे परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ३ लाख रुपये देऊ शकले नाही. या कारणावरून पती पवन धनगर याने शिवीगाळ करून मारहाण केली तर पैसे आणले नाही म्हणून सासू आणि सासरे यांनी विवाहितेला घरातून हाकलून दिले.
दरम्यान विवेता या रामेश्वर कॉलनी येथील माहेरी निघून आल्या. शुक्रवार २९ एप्रिल रोजी सायंकाळी विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती पवन बाबूलाल धनगर, सासु कल्पना बाबूलाल धनगर, सासरे बाबूलाल महादू धनगर सर्व रा. कोल्ह ता. पाचोरा जि. जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.