Home Cities जळगाव डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरीक्त कार्यभार !

डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरीक्त कार्यभार !

0
133

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महापालिकेचे आयुक्त डॉ. सतीश कुलकर्णी आज सेवानिवृत्त होत असून यानंतर त्यांच्या पदाचा कार्यभार हा अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे येणार असून याबाबतचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त आज निवृत्त होत आहेत. यामुळे त्यांच्या जागेवर कोण येणार याबाबत उत्सुकता लागली आहे. या अनुषंगानेे त्यांच्या रिक्त होणार्‍या पदाची अतिरीक्त जबाबदारी मनपाच्या अतिरीक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे आदेश शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले.

यामुळे तूर्तास जळगाव शहर महापालिकेला कायमस्वरूपी आयुक्त मिळणार नसून डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे याची अतिरिक्त जबाबदारी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound