जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तरूणीला ब्लॅकमेल करून आठ वर्षांपर्यंत सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणातील पाच संशयितांना पोलीस कोठडी मिळाली असून दोन महिला मात्र फरार झाल्या आहेत.
या संदर्भातील वृत्त असे की, एका तरूणीला आठ वर्षे ब्लॅकमेल करून तिचे शारिरीक शोषण केल्याच्या प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात दोन महिलांनी बलात्कार्यांना साथ दिल्याची माहिती समोर आल्याने त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तरुणीने आठ वर्षांनंतर या घटनेला वाचा फोडली. सात जणांच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यातील प्रमुख संशयित रितेश सुनील बाविस्कर (वय २७), पवन उर्फ बंटी अशोक झारपकर (वय २७), राहुल सुरेश सोनवणे (वय २६), सुनील काशिनाथ बाविस्कर (वय ४८) व उर्वेश अनंत पाटील (वय १९, सर्व रा. भुसावळ) यांना पोलिसांनी अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे ऍड. प्रदीप महाजन यांनी काम पाहिले.
दरम्यान, याच प्रकरणात शोभा सुनील बाविस्कर व नंदिनी राहुल कोळी या दोन महिलांनी बलात्कार करणार्यांना साथ दिल्यामुळे त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या फरार झाल्या आहेत.