Home Cities जळगाव Police Crackdown : शहरातील सट्टा व जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

Police Crackdown : शहरातील सट्टा व जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

0
45

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जाखनीनगरात सुरू असलेल्या सट्टा व जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सिंधी कॉलनी जवळील जाखनीनगरात एक जण सट्टा व जुगाराचे आकडे लावत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली.

त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, पोलीस नाईक गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, महिला पोलिस कॉन्स्टेबल भारती देशमुख, गोविंद पाटील यांनी मंगळवारी, २६ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता छापा टाकला.

संशयित आरोपी पवन विजयसिंह भाट रा. जाखनीनगर कंजरवाडा, जळगाव पोलिसांना पाहून पसार झाला असून या ठिकाणी पोलिसांनी १७० रूपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे. एमअयडीसी पोलीस ठाण्याचे पो.कॉ. गोविंद पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पवन भाट यांच्या विरोधात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


Protected Content

Play sound