Home राजकीय नवनीत राणांचे ‘डी गँग’ सोबत कनेक्शन : संजय राऊतांचा गंभीर आरोप

नवनीत राणांचे ‘डी गँग’ सोबत कनेक्शन : संजय राऊतांचा गंभीर आरोप

0
34


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार नवनीत राणा या ‘डी गँग’च्या युसुफ लकडवाला याच्याकडून कर्ज घेतले असून या कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप केले आहेत. भोंगे प्रकरण, हनुमान चालिसा प्रकरण, मुंबईमधील घडामोडी यामागे ‘डी गँग’, अंडरवर्ल्ड आणि त्यांचा पैसा काम करत आहे. डी गँगचा फायनान्सर लकडावाला ज्याचा ईडीच्या कोठडीत मृत्यू झाला, त्या डी गँगचे आणि राणा दांपत्याचे आर्थिक संबंध कसे आहेत याचं एक लहानसं प्रकरण समोर आलं आहे. याची चौकशी ईडीकडून का झाली नाही? जर लकडावालाने मनी लॉंड्रिंग केलं आहे आणि पैसा अनेक ठिकाणी फिरवला असून त्यातील एक लाभार्थी राणा दांपत्य आहे. हे पैसे का आणि कशासाठी घेतले हा तपासाचा भाग आहे. पण आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराकडून घेतलेल्या पैशांचा वापर कुठे केला? अजून काही व्यवहार आहेत का? याचा तपास मुंबईच्या आर्थिक शाखेने का केला नाही? नंतर तो ईडीच्या ताब्यात होता. याचा तपास होणं गरजेचं आहे.

खासदार राऊत पुढे म्हणाले की, जर नवाब मलिक, अनिल देशमुख आणि आमच्यासारखे अनेक लोक अशा प्रकरणात ईडीचे पीडित ठरले आहेत, तर राणा दांपत्य यातून कसं सुटू शकतं? त्यांना कोणत्या आंतरराष्ट्रीय शक्ती वाचवत आहेत? त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात अस्थिरता, अशांतता निर्माण करु इच्छित आहेत. हा तपासाचा विषय आहे. मी एक प्रकरण समोर आणलं असून अजून प्रकरणं आहेत. मी मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यांसह सर्व माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी योग्य ठिकाणी माहिती पाठवली आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.


Protected Content

Play sound