रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरात कोणीही नसतांना केळीच्या घळाची वाहतुक करणाऱ्या एका २२ वर्षीय अविवाहीत मजूर युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या बाबत वृत्त असे की, मोहगण येथे राहणाऱ्या आणि केळीच्या घळाची वाहतुक करणाऱ्या हुसैन मुसिर तडवी या २२ मजूराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
रविवार, दि.२४ एप्रिल रोजी रात्री घरात कोणीही नसतांना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असून याबाबत रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.