रावेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शौचालय घोटाळ्यातील एकाला’ही पोलिस प्रशासन सोडणार नाही. घोटाळा करणारे सर्व तुरुंगात जातील असा इशारा आ. चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
आ. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, गरीब जनतेचा पैसा वारेमाप पध्दतीने कोणाच्याही खात्यावर वर्ग केला जाता असेल तर हे प्रकरण खुप गंभीर असून या प्रकरणात बीडीओ’ची जबाबदारी काय होती ? त्यांचे इतके महीने दुर्लक्ष का ? या सर्व बाबींची पोलिस चौकशी करतील या भ्रष्टाचार प्रकरणात जबाबदार असलेले कोणालाच सोडले जाणार नाही. पत्रकार कृष्ण पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे रावेर पंचायत समितीतील सुमारे दिड कोटीच्यावर शौचालय घोटाळा बाहेर आला आहे. या प्रकरणी दोघ कंत्राटी कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन आजचा पाचवा दिवस असून पोलिस सध्या बँका व बीडीओ यांना पत्रव्यवहार करून याद्या मागवत आहे. यात भ्रष्टाचार झाल्याच सिध्द झाल्यानंतर अटकसत्र सुरु होईल असे तपास अधिकारी सहायक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक यांनी सांगितले.