Home क्राईम Bike theft : अपार्टमेंटमधून तरूणाची दुचाकी लांबविली

Bike theft : अपार्टमेंटमधून तरूणाची दुचाकी लांबविली

0
58
bike thieves 20180259850
bike thieves 20180259850


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गौरी हाइट्स अपार्टमेंट येथून तरूणाची २० हजार रूपये किंमतीच टीव्हीएस दुचाकी चोरून नेले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती अशी की, अशिष किशोर सोनवणे (वय-३८) रा. गौरी हाईटस् अपार्टमेंट भोईटे नगर जळगाव हा तरुण खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. नोकरीवर जाण्यासाठी २० हजार रुपये किमतीची टीव्हीएस आपाची आरटीआर १६० मॉडेलची दुचाकी आहे. २३ एप्रिल रोजी १.३० वाजता दुचाकी पार्क करून लावली होती. व कामानिमित्त बाहेर निघून गेले होते. दरम्यान सायंकाळी ५.३० वाजता आल्यानंतर त्यांनी जागेवर दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी त्यांच्या दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून आली नाही. अखेर रविवार २४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक योगेश बोरसे करीत आहेत.


Protected Content

Play sound