Home Cities अमळनेर सुषमा पाटील आदर्श सरपंच पुरस्कारने सन्मानित

सुषमा पाटील आदर्श सरपंच पुरस्कारने सन्मानित

0
30

अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिवदच्या लोकनियुक्त सरपंच सुशमाताई वासुदेव देसले पाटील यांना आदर्शगाव हिवरेबाजार येथे सरपंच परिषदेत राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

आदर्शगाव हिवरेबाजार येथे सरपंच परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सुशमाताई वासुदेव देसले पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच हा पुरस्कार व सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी आमदार सुरेश धस, आमदार निलेश लंके, आमदार प्रशांत बंब, सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, सरपंच परिषद सरचिटणीस विकास जाधव, इडी संचालक उज्ज्वल चव्हाण, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे यांची प्रमुख उपस्थितीत होती. त्यांनी गावात केलेल्या पारदर्शक कार्य व गावविकास कामाचे कौतुक म्हणून करण्यात आला.नमूद प्रसंगी दहीवद ग्राम पंचायत उपसरपंच.बाळू आबा पाटील, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र माळी, रेखा राजेंद्र पाटील, मालुबाई सुरेश माळी, आशाबाई मोतीलाल माळी, तसेच सुनील माळी, मनोज भिल, नाना शंकर पाटील, गणेश शिवाजी पाटील, प्रदीप आत्माराम पाटील, भटू पाटील, संजय सुधाकर पाटील, कैलास महाराज, योगेश पाटील, जयश्री भदाने पाटील, धनराज पाटील, धनराज न्हावी, भैया पुजारी हेउपस्थित होते. हा मानाचा पुरस्कार सुषमाताई देसले पाटील यांना मिळाल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक केले जात आहे. सौ देसले यांना यापूर्वी असंख्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.


Protected Content

Play sound