Home Cities जळगाव Demand : “सिन्हा साहेब गोलमाल व्यक्तिमत्व !” – स्थानिक रहिवाश्याचं मत (व्हिडीओ)

Demand : “सिन्हा साहेब गोलमाल व्यक्तिमत्व !” – स्थानिक रहिवाश्याचं मत (व्हिडीओ)

0
24

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अजिंठा चौफुलीच्या पुढे असणार्‍या ममता हॉस्पिटलजवळ अंडरपास करण्यात यावा’ अशी मागणी करत केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्र्याना रहिवाशांनी निवेदन दिले आहे. न्हाईचे अधिकारी चंद्रकांत सिन्हा यांच्यावर रोष व्यक्त करत “सिन्हा साहेब गोलमाल व्यक्तिमत्व है !” असं मत व्यक्त केलं आहे.

ममता हॉस्पिटलजवळ अंडरपास करण्यात यावा याबाबत आजवर पाठपुरावा करण्यात आला असला तरी याची दखल घेतली नसल्याचे सांगत याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना नागरिकांनी न्हाईचे अधिकारी चंद्रकांत सिन्हा यांच्यावर रोष व्यक्त केला.

यासंदर्भात आम्ही गेल्या तीन वर्षापासून मागणी करत असून अभियंता चंद्रकांत सिन्हा यांनी आतापर्यंत फक्त आश्वासन दिलं. कोणाला नाही म्हणायचं नाही आणि कामही करायचं नाही. मोठे आश्वासन द्यायचे आणि ते पूर्ण करायचे नाही. असं तत्व असणारे सिन्हासाहेब म्हणजे गोलमाल प्रकारचं व्यक्तिमत्व असल्याचं विधान याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलतांना नागरीकांनी व्यक्त केलं आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/353650450068487


Protected Content

Play sound