लमांजन विकासोवर शिवसेनेचा भगवा; चेअरमनपदी विलास पाटील

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील लमांजन येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी येथे नुकतीच निवडणूक पार पडली. यात शिवसेनेचे आपले वर्चस्व सिध्द केले आहे. विकासोच्या चेअरमनपदी विलास पाटील तर व्हा. चेअरमनपदी मथुराबाई धनगर यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील लमांजन येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या १३ जागांसाठी निवडणूक नुकतीच पार पडली. शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे १३ सदस्य रिंगणात उभे होते. यापैकी ८ उमेदवार हे निवडणूकीत निवडून आले आहे. यात समाधान युवराज कोळी , आनंदा हरचद पाटील, विलास भिका पाटील , मिराबाई सिताराम पाटील, मथुराबाई लखा धनगर,  धनराज हिरामण पाटील (ईश्वर चिठ्ठी), जगन संभाजी पाटील (ईश्वर चिठ्ठी) अरूण दगा पाटील (बिनविरोध) यांचा समावेश आहे.

दरम्यान, बुधवारी २० एपिल रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली. यात चेअरमनपदी विलास भिका पाटील तर व्हाईस चेअरमन पदी मथुराबाई लखा धनगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. विरकर यांनी कामकाज पाहिले. याप्रसंगी गोरक्षनाथ पाटील, हरीनाना धनगर, शशीकांत चव्हाण, पांडुरंग पाटील, हिलाल पाटील, नाना पाटील, वाल्मिक धनगर, विजय पाटील, आबा धनगर यांच्यासह नवनिर्वाचीत सदस्य उपस्थित होते.

 

Protected Content