अमळनेर येथे ग्रेटर खान्देश अधिवेशनाबाबत उद्या बैठक

meeting clipart

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे धुळे येथे जूनमध्ये होणाऱ्या “ग्रेटर खान्देश अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील संघटनांची समन्वय बैठक उद्या (दि.६) सकाळी १०.०० वाजता येथील जी.एस. हायस्कुलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

 

माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. धुळे येथे पुढील महिन्यात घेण्यात येणाऱ्या “ग्रेटर खानदेश” अधिवेशनाबाबत व शिक्षण क्षेत्रातील समस्या व धोरणाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content