Home अर्थ जळगावात गुंतवणूक तज्ज्ञ क्रिशन शर्मा यांचे व्याख्यान ( व्हिडीओ )

जळगावात गुंतवणूक तज्ज्ञ क्रिशन शर्मा यांचे व्याख्यान ( व्हिडीओ )

0
42

जळगाव प्रतिनिधी । खान्देश आयएफए असोसिएशन व एचडीएफसी यांच्या सयुक्तिक विद्यमानाने गुंतवणूकदार जागृती अंतर्गत ८ मे रोजी गुंतवणूक तज्ज्ञ क्रिशन शर्मा यांचे व्याख्यान आयोजित केल्याची माहिती आज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर बढे यांनी दिली.

क्रिशन शर्मा यांचे व्याख्यान छत्रपती शंभाजी महाराज नाट्यगृह येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती खान्देश आयएफए असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर बढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी प्रदीप मंडोरे, युवराज बारी, रोहित मिश्रा, देवेंद्र भावसार उपस्थित होते. ते म्हणाले की, क्रिशन शर्मा हे भारत… संपत्ती निर्माण की राजधानी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची चमकणारी अर्थव्यवस्था कशी असेल, सामान्य नागरिकाने कशा प्रकारची गुंतवणूक करावी ? याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच व्यक्तिगत गुंतवणूक, म्युच्युअल ़फंड यामधील संधी, गुंतवणूक करतांना येणारे अडथळे, भारतात उपलबध असणार्‍या गुंतवणुकीच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या सोबतच नागरिकांच्या शंकांचे निरसन श्री. शर्मा करणार आहे. हा कार्यक्रम जवळपास २ तास चालणार असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

पहा : ज्ञानेश्‍वर बढे यांनी दिलेल्या माहितीचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound