मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । दहावी, बारावीचा निकाल उशिरा लागण्याची चर्चा सुरू असतांना तो वेळेवर लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
अहमदनगरमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात वर्षा गायकवाड बोलत होत्या. या संदर्भात बोलतांना शिक्षणमंत्री म्हणाल्या की, “यावर आम्ही मार्चमध्ये एक बैठकमध्ये घेतली होती. पुढच्या आठवड्यातही एक बैठक होणार असून साधारणत: पंधरा दिवसाच्या अंतराने दहावी आणि बारावीचा निकाल लागतात तसे यंदाही वेळेत निकाल लागणार आहेत. “