जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार व परिवहन मंत्री यांच्या आवाहनानुसार ८ ते १५ एप्रिल दरम्यान जळगाव विभागात सुमारे ३९१ कर्मचारी कामावर हजर झाले असल्याची माहिती विभाग प्रमुख भगवान जगनोर यांनी दिली.
जिल्ह्यात यावल, चाळीसगाव, रावेर २, एरंडोल ४, अमळनेर ९, मुक्ताईनगर, भुसावळ १०, पाचोरा १२, जळगाव १३, चोपडा १४, जामनेर १६ असे ९४ कंत्राटी तर ३ सेवानिवृत्त एकूण ९७ चालक सेवेत आहेत. त्यापैकी ७१ चालकांनी सुमारे २० हजार ६३४ किमी अंतराच्या बसेस फेऱ्याद्वारे प्रवासी वाहतूक केली आहे. जिल्ह्यातील ११ आगारात सुमारे ४० परिवहन सेवा सुरु करण्यात आली असून ८ शिवनेरी, २ एसी स्लीपर, ३०३ साध्या बसेसच्या माध्यमातून विविध मार्गावर प्रवासी सेवा सुरु आहेत. यातून ४७ लाख ८६ हजार ५७२ रुपये महसूल दिवसाला प्राप्त होत असल्याची माहिती विभाग प्रमुख यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
८ ते १५ एप्रिल दरम्यान १३७ चालक, १६० वाहक, ४ वाहक कम चालक, ८४ कार्यशाळा कर्मचारी आणि ६ प्रशासकीय कर्मचारी असे एकूण ३९१ कर्मचारी जळगाव विभागात कामावर हजर झाले आहेत.