Home Cities जळगाव ‘मोशन’तर्फे नीट, जेईई, होमी भाभा परीक्षेवर मोफत सेमिनार

‘मोशन’तर्फे नीट, जेईई, होमी भाभा परीक्षेवर मोफत सेमिनार

0
37

जळगाव प्रतिनिधी | ‘मोशन इन्स्टीट्युट’तर्फे नीट, जेईई, होमी भाभा सारख्या महत्वाच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेला सेमीनार दि.१६ आणि १७ रोजी जळगाव, भुसावळात आयोजीत करण्यात आला असून विद्यार्थ्यांना यासाठी मोफत प्रवेश मिळणार आहे.

मोशन या नामांकित संस्थेतर्फे उच्च शिक्षणाची उंच भरारी घेऊ पाहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मोफत सेमिनारचे आज आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.१६ रोजी जळगावात छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे संध्याकाळी ५.३० ते ८ यावेळेस तर दि.१७ रोजी भुसावळ येथे संध्याकाळी ५.३० ते ८ या वेळेत ‘मोशन सेंटर’ साई जीवन सुपरशॉप जवळ, यावल रोड येथे हा सेमीनार आयोजीत करण्यात आला आहे.

यात मोशन चे कोटा येथील सह संचालक अमित वर्मा, मोशन चे ारींही विभागप्रमुख आतिष अग्रवाल कोटा, मोशन चे डायरेक्टर नितीन पाटील हे मार्गदर्शन करणार आहे. नीट आणि जेईईत यश संपादन केलेले विद्यार्थी देखील आपला अनुभव सांगणार आहेत. सेमीनारला येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून विजेत्यांना आयआयटी मुंबई व किंग एडवर्ड हॉस्पिटल, सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजला भेट देण्याची संधी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांनी या मोफत सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन मोशन इन्स्टीट्युटच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound