उत्पादन शुल्क विभागाला मिळाला सर्वाधिक महसूल

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्य उत्पादन शुल्क विभागाला या २०२१-२२ आर्थिक वर्षात सर्वाधिक महसूल मिळाला आहे. या आर्थिक वर्षात २३५८ लिटर मद्यविक्री महसुलातून तब्बल १७ हजार १७७ कोटींची उलाढाल झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत २ हजार कोटींनी उलाढालीत वाढ झाली आहे.

राज्यात गेल्या दोन वर्षात संसर्ग प्रादुर्भावामुळे संचारबंदी लॉक डाऊन मुळे सर्वच व्यवसाय डळमळीत झाले होते. २०२०-२१ या काळात लॉकडाउनमुळे मद्य विक्री व्यवसायाला खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे राज्य ऊत्पादन शुल्क विभागाला सर्वाधिक महसूलात तुट आली होती. परंतु २०२१-२२ या आर्थिक वर्षात तब्बल १७ हजार १७७ कोटींची दारु विक्री झाली असून २०२०-२१ च्या तुलनेत ही वाढ तब्बल २ हजार कोटींनी अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मद्यविक्रीत मोठी वाढ झाली असल्याने राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २०१९-२० या आर्थिक वर्षात २ हजार १५७ लाख लीटर मद्यविक्री होऊन २२ टक्क्यांची घट झाली असल्याचे दिसून आले. तर २०२०-२१ मध्ये १ हजार ९९९ लिटर मद्य विक्री ची नोंद असून २०२१-२२ मध्ये २३५८ लिटर मद्य विक्रीतून महसुली उत्पनात वाढ झाली. २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ १७ टक्क्यांनी वाढ झाली गेल्या तीन आर्थिक वर्षातील सर्वाधिक महसूली उत्पन्न राज्य उत्पादन शुल्क विभागाला २०२१-२२ मध्ये मिळाले आहे. उत्पादन शुल्क विभागाला १८ हजार कोटींचं उद्दिष्ट होते. परन्तु ते पूर्ण होऊ शकले नाही.

Protected Content