Home Cities जळगाव संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘संविधान वाचन’

संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘संविधान वाचन’

0
46


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती निमित्त संविधान वाचन करण्यात आले.

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सुरुवातीला  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापिका शीतल कोळी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रसंगी मंचावर श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्थेचे सचिव  तथा उपशिक्षक मुकेश नाईक उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी तर आभार उज्वला नन्नवरे यांनी मानले. यावेळी आम्रपाली शिरसाट, साधना शिरसाट, दिनेश पाटील, निशा मराठे, नयना अडकमोल, सोनाली चौधरी आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound