पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
त्यावेळी शालेय समिती चेअरमन खलील देशमुख यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील, ए. बी. अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, आर. बी. बोरसे, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.