यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विविध मागण्यांसाठी महसुल कर्मचाऱ्यांचा मागील दहा दिवसापासून यावल तहसील कार्यालयासमोर संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या दहाव्या दिवशी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन आ.शिरीष चौधरी व आ.लताताई सोनवणे यांना दिले.
मागील दोन वर्षापासून अव्वल कारकून /मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती होत नसल्याने तसेच महसुल सहाय्यकचे रिक्त पदे शासनाकडून भरण्यात येत नसल्याने महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटेनेच्या मागील दहा दिवसापासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेले असल्याने अनेक नागरीकांना विविध समस्या व अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान यावल येथील महसुलच्या संपकरी कर्मचारी यांनी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी आणी आमदार सौ .लताताई सोनवणे यांना आपल्या मागण्याचे निवेदन सादर करुन सदरच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याची विनंती त्यांनी त्यांची भेट घेवुन केली असून यासंदर्भात शासन पातळीवर काय निर्णय होते हे आपण बघावे लागेल असे संपकऱ्यांशी बोलतांना आमदार शिरीष चौधरी यांनी सांगीतले.
या वेळी त्यांच्या सोबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर पाटील , वढोदे येथील सरपंच संदीप सोनवणे व आदी कार्यकर्त व पदाधिकारी उपस्थित होते. या संदर्भात संपावर गेलेल्या महसुल कर्मचारी यांनी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात मागण्याचा समावेश आहे
यात राज्यातील कोकण, नागपूर व नाशिक तसेच इतर विभागचे अव्वल कारकुन/मंडळ अधिकारी संवर्गातुन नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर मागील दिड ते दोन वर्षापासून प्रलंबित असल्याचे दिसुन येते. शासन निर्णय महसुल व वन विभाग दिनांक १० मे २०२१ अन्वये नायब तहसीलदार संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे व त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्या सेवाजेष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढलेले आहे. परंतु अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरिय संवर्ग असल्याने त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रीया ही अन्यायकारक असल्याने सदर पत्र तात्काळ रद्द करण्यात यावे. मंत्रालय स्तरावर या प्रलंबीत विभागनिहाय संपूर्ण पदोन्नती प्रस्तावास तात्काळ मान्यता प्रदान करून पदोन्नतीचे आदेश निर्गमित करणे, महसुल सहाय्यकाची पदे भरणे इत्यादी मागण्या विहीत काल मर्यादेत मान्य कराव्या. या मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. आदी मागण्यांसाठी महसुल कर्मचाऱ्यांचे मागील दहा दिवसापासून यावल तहसील कार्यालयासमोर संप पुकारण्यात आला आहे.