यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिंचोली येथे घडलेल्या घटनेचा एकाने धार्मिक भावना दुखविणारा चुकीचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारीत करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याची आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांनी तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात एका संशयीतास अटक करण्यात आली असून इतर तिन संशयीत आरोपी हे फरार झाल्याचे वृत्त आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की , चिंचोली तालुका यावल येथे एका तरुणाने गायीला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हीडीओ हा सोशल मिडीयावर व्हायरल झाला असतांना, सदरच्या घडलेल्या या घटने बाबतची चुकीची माहीती देवुन दोन समाजात तेढ निर्माण होईल असा पद्धतीने एका समाजाचा तरुण हा सोशल मिडीयावर त्या गायीला अमानुषपणे मारहाण करीत असल्याची दिशाभुल करणारी व जातीय भावना भडकवणारी आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल या हेतुने व्हीडीओ व्हायरल करून , पोलीसांना चुकीची माहीती दिल्या प्रकरणी यावल पोलीसात शहरातील चार तरुणांविरूद्ध भादवी १५३ अ१८२, ३४ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका संशयीत आरोपी राहुल धनराज कोळी यास पोलीसांनी अटक केली आहे. मात्र या गुन्ह्यातील इतर तिन संशयीत हर्षवर्धन भोईटे , कमलेश शिर्के, मयूर महाजन सर्व राहणार सुतारवाडा यावल हे संशयीत आरोपी मात्र पळवुन गेल्याचे वृत्त आहे. या संदर्भात आयपीएस अधिकारी आतिश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण व हेड कॉस्टेबल राजेश वाढे आदी करीत आहे.