जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माहेरहून पैसे आणावे यासाठी विवाहितेचा मानसिक छळ केल्याप्रकार समोर आलाय. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुरेश नगरातील माहेर असलेल्या सिमा सचिन कुमावत (वय-२९) यांचा विवाह सचिन शांताराम कुमावत यांच्याशी रितीरिवाजानुसार विवाह झाला आहे. लग्नाच्या दोन वर्षांपासून विवाहिता सिमा कुमावत यांना पती सचिन कुमाावत, सासू चंद्रकता कुमावत, जेठ संदीप कुमावत (रा. निफाड, जि. नाशिक) यांच्याकडून माहेरून पैसे आणावे म्हणून शारीरिक मानसिक छळ केला जात होता. अखेर हा त्रास असह्य झाल्यानंतर सिमा यांनी माहेर गाठले आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.