Home Cities धरणगाव धरणगावात भाजप स्थापना दिन उत्साहात

धरणगावात भाजप स्थापना दिन उत्साहात

0
41


धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्याच्या वतीने भाजपचा स्थापना दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला

याप्रसंगी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटिल यांनी सर्वांना लाडू खाऊ घातले. उत्साहाच्या सुरुवातीस जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांनी भारतमातेचे पूजन केले तर पुनीलाल आप्पा महाजन यांनी माल्यार्पण केले. त्याप्रसंगी शिरिष बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष अॅड संजय महाजन, प्रकाशदादा सोनवणे, अॅड वसंतराव भोलाने, शेखर पाटील, दिनेश पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, कडुअप्पा बयास, भालचंद्र माळी, सुनील चौधरी, मधुकर पाटील, कन्हैया रायपूरकर, टोनी महाजन, सचिन पाटील, अनिल महाजन, विशाल महाजन, दुर्योधन भिल, विक्की महाजन, किशोर चौधरी, रवि पाटील, रवि मराठे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. 21ऑक्टोबर 1951 जनसंघ-डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी,पंडित दिनदयालजी  ते 6 एप्रिल 1980 भा.ज.पा.- श्रध्येय अटलजी,आडवाणीजी ते आज मा.मोदीजी ‘अमितजी असा हा, अंगीकारलेल्या विचारांशी एकनिष्ठ राहून,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आशीर्वाद व मार्गदर्शन घेत जुन्या व नव्या कार्यकर्ते, नेत्यांनी,लोकप्रतिनिधींनी  केलेला दीर्घ प्रवास. सत्ता हे साध्य नसून साधन आहे,अंत्योदय सर्वांचा विकास,सशक्त व संस्कारित-वैचारिक भारत हे ध्येय सर्वांनी समोर ठेवले. त्या वेळेस स्व.अटलजींनी उदगारलेले वाक्य,’ सुरज उगेगा, अंधेरा छटेगा,कमल खिलेगा ‘ याची प्रचिती आज दिसतेय. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ सबका साथ सबका विकास हे उद्दिष्ट ठेवून घेतली.

 


Protected Content

Play sound