Home राष्ट्रीय फ्लोरिडात विमान नदीत कोसळले; प्रवासी सुखरूप

फ्लोरिडात विमान नदीत कोसळले; प्रवासी सुखरूप


florida boeing accident
 

फ्लोरिडा (वृत्तसंस्था) अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये प्रवासी विमान नदीत कोसळले. विमानातील सर्व 136 प्रवासी सुखरुप आहे. फ्लोरिडातील जॅक्सनविलेमध्ये हा अपघात झाला.

 

 

फ्लोरिडामधील जॅक्सनविलेच्या सेंट जॉन नदीत शुक्रवारी बोइंग 737 प्रवासी विमान कोसळले. विमान लँडिंग करत असताना ही दुर्घटना घडली आहे. विमान नदीत कोसळले, त्या दरम्यान विमानातून 136 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाहीय. जॅक्सनविले येथील विमानतळावर विमान उतरत असताना धावपट्टीच्या शेवटच्या भागात असलेल्या सेंट जॉन्स नदीत कोसळले. या विमानात १३३ प्रवासी आणि ७ क्रू कर्मचारी होते. विमान नदीतील खोल पाण्यात न कोसळल्यामुळे मोठा अपघात टळला असल्याची चर्चा आहे. स्थानिक यंत्रणांकडून मदत आणि बचाव कार्य त्वरीत सुरू करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound