मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पुढील चार दिवस पावसाची शक्यता मुंबईच्या हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे.
येत्या ४ दिवसांत महाराष्ट्रात अनेक भागात दुपारी उन्हाचा चटका आणि त्यानंतर ढगाळ वातावरणासह पावसाळी स्थिती असे विचित्र वातावरण राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळणार आहे.