Home Cities अमळनेर जुनी पेन्शन संघटना जिल्हा संघटकपदी उमाकांत हिरे

जुनी पेन्शन संघटना जिल्हा संघटकपदी उमाकांत हिरे

0
34

अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हा संघटक म्हणून उमाकांत हिरे यांची वरिष्ठांच्या मार्गदर्शन आणि निर्देशानुसार नियुक्ती झाली आहे.

अमळनेर येथील द्रौ.रा. कन्या शाळेतील शिक्षक तथा खान्देश शिक्षण मंडळातील कायम शिक्षक संघाचे चिटणीस उमाकांत अशोकराव हिरे यांची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हा संघटकपदावर नियुक्ती करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष गोविंदा ठाकरे पाटील यांनी उमाकांत हिरे यांची नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल हिरे यांचे शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound