Home Cities जळगाव सुमधुर ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमास जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुमधुर ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमास जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
34

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | करोनामुळे लागू र्निबध मुक्त केल्यामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर साजरा होणारा गुढीपाडवा यंदा सर्वत्र जल्लोषात साजरा केला जात आहे.याच पार्श्वभूमीवर आ. राजूमामा भोळे यांनी जळगावकरांसाठी आयोजित पाडवा पहाट संगीत कार्यक्रमातील गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झालेत.

 

चैत्र शुद्ध ,प्रतिपदा गुढीपाडवा हिंदू नववर्ष निमित्त भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष तथा आ.राजू मामा भोळे यांच्या वतीने शहरवासियांसाठी पाडवा पहाट संगीत कार्यक्रमचे आयोजन महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. प्रथम गुढी उभारून तिची विधिवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, माजी महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्ष ना. रंजना पाटील, भाजप महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका अॅड. शुचिता हाडा, उज्वला बेंडाळे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, भरत अमळकर आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound