जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा जळगाव शहर आम आदमी पार्टीतर्फे मुक निषेध करण्यात आला.
जळगाव शहर आम आदमी पार्टीतर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रेल्वे स्टेशनजवळील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या घरावरील हल्ल्याचा मूक निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जळगाव शहर आम आदमी पार्टी महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले की, दि. ३० मार्च रोजी आम आदमी पार्टीचे संयोजक तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी हल्ला केला आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरावरील हल्ला हा दडपशाहीचा लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप करत आम्ही याचा निषेध करतो असे स्पष्ट केले. याप्रसंगी आप महानगर उपाध्यक्ष अनिल वाघ, जिल्हा सचिव रईस खान, महानगर सचिव चंदन पाटील, योगेश भोई आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1017722679167432