Home धर्म-समाज करणी सेनेच्या जळगाव जिल्हा संघटकपदी विनोद राऊळ

करणी सेनेच्या जळगाव जिल्हा संघटकपदी विनोद राऊळ

0
56

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । देशहित व सामाजिक संघटन या उद्देशाने देशभर काम करणाऱ्या करणी सेनेचे जळगाव जिल्हा संघटकपदी तालुक्यातील नगरदेवळा येथील माजी उपसरपंच विनोद राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरजपाल अम्मूजी यांच्या सुचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवीचंदसिंह बारवाल यांच्या मान्यतेने करणी सेनेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष महेंद्रसिंह रणजितसिंह पाटील यांनी ही नियुक्ती जाहीर केली असून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. नगरदेवळा सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचे १५ वर्षे सदस्यपद भुषविलेले विनोद राऊळ यांची संघटकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच जळगांव जिल्हा राजपूत समाज व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दिग्गजांकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

 

 


Protected Content

Play sound